सिंधुदूर्ग : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे लोहखनिज उत्खननच्या बंधारा फुटल्याने कळणे गावात २० ते २५ घरामध्ये खाणीतील चिखलयुक्त पाणी घरात गेलं तर ३५ ते ४० हेक्टर जमीन बाधित होऊन भातशेती, नाचणी शेती, सुपारीच्या बागा आणि काजूच्या बागाचे नुकसान झाले. इतकेच नाहीतर गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत चिखल युक्त पाणी गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे बागायतीत पाणी गेल्याने अनेकांची आयुष्य भराच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे सदर प्रकल्प पुर्णतः बंद झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी लोहखनिज उत्खनन प्रकल्पातून एक मोठा आवाज आला. त्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरामध्ये लोहखनिज उत्खनन प्रकल्पातील चिखल युंक्त पाणी घरात आणि शेतात गेलं.

डोंगर कोसळून काजू बागायती नष्ट झाल्या. ३५ ते ४० हेक्तर जमीन कायमस्वरूपी बाधित झाली आहेत. यामुळे मायनिंग कंपनीवर गुन्हा दाखल करा अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. यासंबंधी ते संसदेत प्रश्न उपस्थतीत करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

लोहखनिज उत्खनन प्रकल्पाचा बंधारा फुटून नुकसान झाल्याने ग्रामस्थांचा उद्देक होणं स्वाभाविक आहे. मात्र, जो मूळ मालक आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. अनेक वर्षे बेकायदेशीर लोहखनिज उत्खनन सुरू आहे. दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा हडप केलेली आहे. वनविभागाची जागा हडप केलेली आहे. लोहखनिज वाहून जाऊ नये यासाठी त्यांनी टाकलेला भराव टाकलेला होता. तो वाहून गेला त्यामुळे हे नुकसान झाले आहे.

लोकसभेत यासंदर्भात आवाज उठवणार असून केंद्र सरकारने मायनिंगला दिलेली ५० वर्षांची मुदतवाढ दिल्याने मायनिंग वाले सुसाट गेले आहेत. मात्र, झालेल्या दुर्घटनेची तातडीने दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून दोषींवर कडक कारवाई करणार असे आश्वासन दिलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here