म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील पूरग्रस्त अडचणीत आहेत, त्यांना आता मदतीची गरज आहे, अभ्यास नंतर करा, आता पॅकेज म्हणा, नाही तर मदत म्हणा, पण पूरग्रस्तांना आधार द्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांनी केली.

फडणवीस यांनी शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला. राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी करतानाच वेळ आली तर यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याची ग्वाही त्यांनी पूरग्रस्तांना दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्ह्णाले, दोन दिवस या भागात दौरा केल्यानंतर पूरपरिस्थिती अतिशय गंभीर असल्याचे लक्षात आले आहे. अलमट्टी, राधानगरी आणि कोयना धरण भरण्यापूर्वीच महापुराचा फटका बसला. हे गंभीर आहे. यामुळे ही गोष्ट गंभीरपणे घेऊन तात्पुरती मदत करतानाच कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे नियोजन करायला हवे.

क्लिक करा आणि वाचा-
ते म्हणाले, पूरपरिस्थिती निर्माण होऊन दहा दिवस होत आले. अजूनही पूरग्रस्तांना तातडीची मदत पोहोचली नाही. त्यांना आता गरज आहे. अशावेळी सर्वेक्षण, अभ्यास या गोष्टी करतानाच प्रथम आधार दिला पाहिजे. शेतकरी, व्यापारी यांना मदत द्यायला हवी. केंद्राकडून सातशे कोटी निधी आला आहे. पण अजून राज्याने मदतीची घोषणा केली नाही. आज करतील, उद्या करतील या अपेक्षेत जनता आहे. ते म्हणाले, दुपारी मुख्यमंत्र्यांशी काही क्षण चर्चा झाली. तातडीची मदत आणि कायमस्वरूपी उपाय याबाबत झालेली ही चर्चा सकारात्मक होती. उद्या मुख्यमंत्री काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.

क्लिक करा आणि वाचा-
दोन वर्षापूर्वी जेव्हा महापूऱ् आला. तेव्हा पुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी सरकारने एक प्रस्ताव तयार केला. त्याला जागतिक बँकेने साडे तीन हजार कोटीची मदत देण्यास मान्यता दिली, पण पुढे सध्याच्या सरकारने काहीच पाठपुरावा केला नाही असा आरोप करून फडणवीस म्ह्णाले, आता तरी याबाबत सरकारने बँकेकडे पाठपुरावा करावा. कारण पुराचे पाणी वळवणे हा चांगला पर्याय आहे.

क्लिक करा आणि वाचा-
नदीला सरसकट भिंत बांधता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, संपूर्ण नदीला भिंत घालणे व्यवहार्य नाही. काही ठिकाणी ते शक्य आहे. महापूरापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी असलेल्या अनेक पर्यायातील तो एक पर्याय आहे. कोल्हापुरात शिरोली पुलापासून बास्केट ब्रिजची संकल्पना होती. त्याला केंद्राने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेतल्यास महापुरामुळे होणारी शहराची कोंडी वाचणार आहे.

राज्य सरकार पूरपरिस्थिती हाताळण्यात अयशस्वी झाली आहे का असे विचारले असता ते म्ह्णाले, ही वेळ सरकारच्या कामाचे मुल्यमापन करण्याची नाही. आता मदत घोषित करण्याची वेळ आहे. ही मदत योग्य की अयोग्य हे वेळ आल्यावर बोलेन.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here