वाचा:
एकेकाळचा दाऊदचा हस्तक असलेला एजाज लकडावाला याला अटक केल्यानतंर त्याच्या चौकशीतून अशी अनेक नावे पुढं आली आहेत. त्यात पोलिसांचा खबऱ्या म्हणून वावरणारा सलीम पेनवाला, फैय्याज सन्नाटा यांच्यासह दाऊदचा एक साथीदार तारिक परवीन याचा समावेश आहे. लकडावालाच्या कबुली जबाबामुळं काही पोलीसही संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. पुजारीचे काही छुपे साथीदारही अशाच प्रकारे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. पुजारी हा स्वत: अंडरवर्ल्डमधील नामचिन गुंड असल्यानं त्याचे साथीदारही तितकेच मोठे असण्याची शक्यता आहे.
पुजारीचा वापर करणाऱ्या काही लोकांची नावं पोलिसांपर्यंत आली आहेत, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. त्यात फिल्म स्टार, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, छोटो गँगस्टर, बुकीज यांच्यासह मुंबई व कर्नाटकातील काही पोलिसांचाही समावेश आहे. आतापर्यंत या सर्वांनी पुजारीपासून अंतर ठेवलं होतं. मात्र, आता पुजारीच पोलिसांच्या तावडीत सापडल्यानं हे सगळे छुपे चेहरे समोर येणार आहेत. खंडणीसाठी पुजारीला कोण आणि कसं नावं पुरवायचं, हे त्याच्या चौकशीतून पुढं येणार आहे. या आधीही पुजारीला काही लोकांचे फोन नंबर दिल्याप्रकरणी खारमधील बांधकाम व्यावसायिक रवी पंजाबी याला मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतलेला एक वरिष्ठ पोलीस अधिकारीही अशाच प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. मात्र, पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times