वाचा:
मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त यांनी केलेल्या १०० कोटी रुपये खंडणीच्या आरोपानंतर ‘ईडी’कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. देशमुख यांना ४० कोटी रुपयांची खंडणी मुंबईतील बारमालकांकडून मिळाली असल्याची ठोस माहिती ‘ईडी’ ला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ४.२१ कोटी रुपयांची संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली आहे. देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक यांनादेखील या प्रकरणी अटक झाली आहे. पण देशमुख यांची चौकशी ‘ईडी’ला अद्याप करता आलेली नाही.
वाचा:
‘ईडी’तील सूत्रांनी सांगितले की, ‘अनिल देशमुख व त्यांचा मुलगा ऋषिकेश यांचे पैशांच्या गैरव्यवहाराशी संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे त्या दोघांच्या चौकशीशिवाय तपास अपूर्ण आहे. त्यासाठी आतापर्यंत चार वेळा देशमुख यांना समन्स बजावण्यात आले होते. पण ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेच पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. या दोघांनीही सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या बेलार्ड पीयर येथील कार्यालयात उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
सुप्रीम कोर्टातही अनिल देशमुख यांना दिलासा नाही
सुप्रीम कोर्टातही अनिल देशमुख यांना दिलासा मिळू शकला नाही. दंडात्मक कारवाई करण्यापासून ईडीला अटकाव करण्यात यावा, अशी विनंती करणारा अर्ज अनिल देशमुख व यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. मात्र असा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला. याआधी अन्य अशा कोणत्याही प्रकरणात दंडात्मक कारवाईला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे असा आदेश या प्रकरणात देणे उचित ठरणार नाही, असे कोर्टाने नमूद केले. यावर ३ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times