पाच दिवसांचा आठवडा लागू केल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत दिवसांतील कामकाजाच्या वेळेत वाढ होणार, अशी चर्चा होती. ती खरी ठरली आहे. आज जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात सर्व कामकाजाचे नवे नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. दिनांक २९ फेब्रुवारी, २०२० पासून ”चा नवा निर्णय लागू करण्यात आल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू होत नसलेल्या सरकारी कार्यालयांची यादीही शासन निर्णयासोबत देण्यात आली आहे.
हे आहेत नवे नियम:
>> सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी राहील. याचाच अर्थ, कामकाजाची वेळ पूर्वीपेक्षा ४५ मिनिटांनी वाढलेली असेल.
>> शासकीय कार्यालयांतील शिपायांसाठी कामकाजाची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.३० ते सायांकाळी ६.३० अशी असेल.
>> दुपारच्या जेवणासाठी अर्ध्या तासाची सुट्टी असेल. ही सुट्टी दुपारी १.०० ते २.०० या वेळेत गरजेनुसार घेता येईल.
>> कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद अधिनियम लागू असलेल्या शासकीय कार्यालयांना तसंच, अत्यावश्यक सेवेच्या अंतर्गत येणारी कार्यालये व शासकीय महाविद्यालये, तंत्रनिकेतने, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार इ. यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार नाही.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times