‘विरोधी पक्षाला काही काम नसतं, डोकं मोकळं असतं त्यामुळे ते काहीही आरोप करतात,’ असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते खासदार यांनी विरोधकांना लगावला आहे. पूरग्रस्तांना सरकार तातडीने मदत करीत नसल्याच्या विरोधकांच्या आरोपाला त्यांनी हे उत्तर दिलं. ते म्हणाले ‘आम्हालाही वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे गुजरातला गेले होते, तसेच हवाई पाहणी करण्यासाठी ते महाराष्ट्रात यावेत, हजार कोटींची मदत देऊन जावे, पण तसे होत नाही.’ ( spokesperson and mp in maharashtra)
अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते झाले. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, खासदार सदाशिव लोखंडे हेही यावेळी उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘सुदैवाने आतापर्यंत ऑक्सिजन अभावी राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तरीही पुढील काळाची गरज ओळखून ठिकठिकाणी ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकीच हा एक प्रकल्प गडाख यांच्या पुढाकारातून झाला आहे. मंत्री गडाख शिवसेनेत आल्यापासून नगर जिल्ह्यातील शिवसेनेला बळ मिळत आहे.’
क्लिक करा आणि वाचा-
राजकीय प्रश्नांवर बोलताना राऊत म्हणाले, ‘हे सरकार तीन वर्षे टिकणार आहे. त्यामुळे तोपर्यंतही कुणी पुन्हा येण्याची शक्यता नाही. एवढेच नाही तर पुढील काळातही हे समीकरण कायम राहू शकते. मी पुन्हा येईनच्या घोषणेचे आता लांडगा आला रे आला सारखे होत आहे. लांडगा काही येत नाही.’
क्लिक करा आणि वाचा-
‘आघाडीत समन्वय नसल्याचा आरोप केला जातो, त्यात तथ्य नाही. याचे उत्तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहेच. सरकार चालविण्यासाठी एकत्र आलो आहोत, पक्ष एकत्र चालविण्यासाठी नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. मागील सरकारमध्येही शतप्रतिशतच्या घोषणा दिल्या जात होत्याच.’, असेही राऊत पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘पूरग्रस्तांची मदत आणि त्यावरून होत असलेले विरोधकांचे आरोप यासंबंधी विचारले असता राऊत म्हणाले, ‘सरकार आपले काम करीत आहे. विरोधक मोकळे असतात. त्यामुळे त्यांचं डोक मोकळं असते. त्यातून ते काहीही आरोप करतात. आम्हालाही वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इकडे यावे. गुजरातची जशी हवाई पहाणी केली तशी महाराष्ट्राची करून हजार कोटींची मदत द्यावी, पण तसे होत नाही. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, त्यावेळी काय चर्चा झाली, ते त्या दोघांनाच माहिती. प्रत्येक ठिकाणी भिंतीला कान नसतात. विरोध आणि सरकार यांच्यात संवाद व्हायलाच हवा, तसा तो होत आहे,’ असेही राऊत म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times