ठाणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असे थेट आव्हानच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिले आहे. पटोले ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

ठाणे काँग्रेसचे उपाध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला नाना पटोले यांनी आज हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी मोदी सरकारवरही तोफ डागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. या नोटबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. मोदींनी काळा पैसा देशात आणणार होते, याबरोबरच ते १५ लाख रुपये देखील तुमच्या खात्यात टाकणार होते. मात्र, यांपैकी त्यांनी काहीही केलेले नाही. नोटाबंदीनंतर तर लोक रांगेतच मरण पावले. अजूनही लोकांच्या खात्यात १५ लाख रुपये आले नाहीत, असे सांगतानाच भाजप सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘मोदी सरकारमुळे ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो’
जीएसटी आल्यानंतर हे सगळे पैसे कुणाच्या घरी गेले हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत पटोले यांनी मोदींवर उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरल्याचा थेट आरोप केला. सामान्य माणसाला मात्र जीएसटीचा काहीच फायदा झाला नसल्याचे ते म्हणाले. देशात लशीचा तुटवडा आहे. शिवाय पूर्वी मोफत मिळत असलेले ऑक्सिजन आता केंद्र सरकारमुळे विकत घेण्याची वेळ आली आहे आणि ही वेळ आणण्याचे पाप मोदी सरकारने केले, असेही पटोले पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसाचे निमित्तसाधून राज्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली जाण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याबरोबरच तृतीय पंथीयांना देखील रेशन किट देण्यात आले. तर अपंग व्यक्तींना व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकार आपल्याला लस देत नाही. आपण मात्र या ठिकाणी लस खरेदी करून लोकांना मोफत देत आहोत. अनेक श्रीमंत लोकांना आपण वाढदिवस साजरा करताना आपण पाहत असतो. मोठ्या हॉटेलमध्ये ते लोक वाढदिवस साजरा करतात. पण काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्या वाढदिवसाच्यानिमित्ताने लोकांना मदत करतात ही खरेच अभिमानाची गोष्ट आहे, असे पटोले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here