गेले अनेक दिवस महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी सतत नियम बदलले जात आहेत. महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग जास्त असल्याने कर्नाटकने प्रवेशासाठी अनेक निर्बंध घातले होते. पहिल्या टप्प्यात करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाची सक्ती करण्यात आली. ते नसेल तर महामार्गावर रॅपिड टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच आत प्रवेश दिला जात होता. नंतर गेले काही दिवस एक लस घेतलेल्या व्यक्तीस आत प्रवेश दिला जात होता. मात्र, आजपासून या नियमात बदल करण्यात आला आहे. एक लस घेतलेल्या व्यक्तीला सरसकट प्रवेश नाकारण्यात येत आहे.
वाचा:
कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आजपासून करोनाचा ७२ तासातील निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी जात असाल तरच रॅपिड टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक केल्याने वाहनधारक व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कोगनोळी टोल नाक्यावर प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. निगेटिव्ह अहवाल असेल तरच पुढे सोडण्यात येत असल्याने पोलिस व प्रवाशी यांच्यात वादावादी सुरू आहे. दिवसभर या नाक्यावर वाहने अडकून पडल्याने दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा दिसत होत्या.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times