म. टा. प्रतिनिधी । सांगली

‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात सांगितले होते. मात्र सभागृहातून बाहेर पडताच लोकसेवा आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागा भरू, असे त्यांनी शब्द फिरवले. धडधडीत खोटे बोलत त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत आणि सदस्यांच्याही नियुक्त्या झाल्या नाहीत. राज्यात पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा सरकारला आहे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय?’ असा सवाल आमदार यांनी विचारला आहे.

वाचा:

महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात आमदार गोपीचंद पडळकर यांनी वारंवार पवार कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली आहे. एमपीएससीच्या परीक्षा रखडल्याच्या मुद्द्यावरून आमदार पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. मात्र सभागृहातून बाहेर पडताच एमपीएससी आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत यांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही एमपीएससीची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते.’

वाचा:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना आमदार पडळकर म्हणाले, ‘कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला आत्महत्येचा मार्ग आणखी काही विद्यार्थ्यांनी निवडावा, असं या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतंय काय? म्हणूनच अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ ते अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते. या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेलं नाही.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here