नाशिकः फोडण्याची भाषा करणारे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील आमदार () यांच्यावर शिवसेना नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. लाड यांच्या वक्तव्यामुळं वातावरण तापलं असतानाच शिवसेना नेत्यांबरोबरच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी एका वाक्यात लाड यांना उत्तर दिलं आहे. छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये बोलत होते. लाड यांच्या वक्तव्याबद्दल विचारला असता भुजबळांना हसू फुटले.

प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यावर भुजबळ यांनी हसत हसतचं उत्तर दिलं आहे. ‘काही लोकांना अधूनमधून विनोद करायची फारच हुक्की येते’, अस उत्तर हसत हसत दिलं आहे. दरम्यान, शिवसेनेतून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केलेले व राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये गेलेले छगन भुजबळ यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर दिलेल्या मिश्किल टिप्पणीची सध्या चर्चा आहे.

वाचाः

काय म्हणाले होते प्रसाद लाड?
भारतीय जनता पक्षाच्या माहीम येथील कार्यालयाबाहेर शनिवारी पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली होती. राणे कुटुंबीयांना मानणारे कार्यकर्ते भाजपमध्ये आल्यामुळं भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. त्यामुळं ते (शिवसैनिक) घाबरून गेले आहेत. आम्ही नुसते माहीममध्ये आलो तरी भाजपवाले शिवसेना भवन फोडायला आले आहेत की काय, असंच त्यांना वाटतं. पण घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू,’ असं लाड यांनी म्हटलं होतं.

वाचाः

हे प्रकरण चिघळल्याचं लक्षात येताच प्रसाद लाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे. ‘मी असं बोललोच नव्हतो. मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे,’ असं लाड यांनी म्हटलं आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here