आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून या दोघांच्या टीकेची धार अधिकच वाढलीय. राणा पती-पत्नी ठाकरे पितापुत्रांवर थेट टीका करत आहेत. रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. ‘करोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात, करोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू कुठं असतील तर महाराष्ट्रात, कोकणात चक्रीवादळ आलं. पूर आला. अनेक गावं बुडाली. घरं बुडाली. लोक मरण पावले. कधी नव्हे ते मुंबईत चक्रीवादळ आलं. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी आत्महत्या करताहेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून कारभार सुरू केला, तेव्हापासून हे सुरू आहे,’ असं राणा म्हणाले.
वाचा:
‘महाराष्ट्रात विदर्भ सुद्धा आहे. इथं नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये शेतकरी आत्मह्त्या करताहेत, पावसामुळं नुकसान झालंय. करोनाची दुसरी लाट अमरावतीतून सुरू झाली. संपूर्ण देशात अमरावतीचं नाव पोहोचलं. तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांमध्ये अमरावतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. वारंवार विनंती करूनही त्यांनी ऐकलं नाही. वारंवार सांगूनही जे ऐकत नाहीत, त्याला आपल्याकडं बेशरम म्हणतात. त्यामुळं ‘मातोश्री’वर बेशरमेचं झाड लावावं लागेल,’ असं राणा म्हणाले.
प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगानंही रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली. ‘बाळासाहेब असताना खरी शिवसेना होती. आता ही शिवसेना काँग्रेस सेना झालीय. उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही ‘दहा जनपथ’ आणि ‘सोनिया गांधी’ या आहेत,’ अशी बोचरी टीकाही राणा यांनी केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times