राज्यात करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या सहा ते सात हजारांच्या घरात आहे. त्यामुळं रुग्णसंख्या स्थिर आहे. मात्र, करोना रुग्णांच्या मृतांची संख्या मात्र अजूनही चिंताजनक आहे.
वाचाः
आज दिवसभर राज्यात ६ हजार ४७९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३ लाख १० हजार १९४ इतकी झाली आहे. तर, १५७ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात ४,६७,९८६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,११७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज करोनामुक्त रुग्णांपेक्षा करोनाबाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या २४ तासांत ४ हजार ११० रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ९४ हजार ८९६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६. ५९ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,८१,८५,३५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,१०,१९४ (१३.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
वाचाः
अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
राज्यात सध्या ७८ हजार ९६२ अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. मुंबईत ५ हजार ४६४, ठाणे जिल्ह्यात ६ हजार २६९ व अहमदनगर जिल्ह्यात ६ हजार ६१० सक्रीय रुग्ण आहेत. तर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १५ हजार ६८० रुग्ण आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times