तालुक्यातील एडवण गावातील १६ ते १७ विद्यार्थी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यासाठी रविवारी दुपारी सफाळे जवळील रोडखड धरणाजवळ जमले होते. यातील काही विद्यार्थ्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. या मुलांसह तन्मेष हा देखील पाण्यात उतरला आणि पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाला. त्याचे अनेक सहकारी मित्र हे सेल्फी काढण्यात इतके मश्गूल होते की आपला मित्र पाण्यात कधी बुडाला याचा थांगपत्ताच त्यांना लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही वेळानंतर तन्मेष हा आपल्या सोबत नसल्याचे सर्वांच्या लक्षात आल्यावर सर्वांनी धावाधाव सुरू केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी धरण, तलाव, धबधबे आणि समुद्र किनाऱ्याच्या लगत जाण्यास प्रतिबंध घातला असताना त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे अशा दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे.
दरम्यान, स्थानिकांच्या मदतीने मृत तन्मेष तरे याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times