मुंबई : सी-फेस आणि उच्चभ्रू लोकांची वस्ती असलेल्या वरळीत प्रॉपर्टी खरेदीसाठी सूरतमधील सावजी ढोलकीया या हिरे व्यापाऱ्याने १८५ कोटी मोजले आहेत. एस्सार समूहाशी संबंधित ही प्रॉपर्टी आहे. २०१२ नंतर वरळीत झालेला हा दुसरा मोठा प्रॉपर्टी व्यवहार ठरला आहे.

वरळी सीफेस लागून असलेल्या पनहार या सहा मजली इमारतीची सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने १८५ कोटींना खरेदी केली आहे. पनहारचा २०००० चौरस फूट क्षेत्रफळ आहे. हा व्यवहार दोन करारानुसार करण्यात आला आहे. ज्यात एका करारात जमीन खरेदी करण्यात आली आहे. दुसऱ्या करारात इमारतीची खरेदी करण्यात आली आहे.जमिनीसाठी ४७ कोटी आणि इमारतीसाठी १३८ कोटींचा सौदा झाला आहे. याआधी २०१२ मध्ये वरळीत एका गेस्ट हाऊसची ४५२ कोटींना विक्री झाली होती.

सूरतमधील हरी कृष्णा एक्सपोर्ट या कंपनीने ही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. हिरे वयापारी सावजी ढोलकीया यांची ही कंपनी आहे. कर्जात बुडालेल्या एस्सार समूहाच्या अर्कय होल्डिंगसने कर्ज घेताना ही प्रॉपर्टी गहाण ठेवली होती. आता याची विक्री झाल्याने तो पैस कर्ज फेडण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा अनेक बड्या गुंतवणूकदारांनी लाभ घेतला होता. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक
यांनी दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवर एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. भोसले यांच्या ‘एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने मुंबईत १०३ कोटी ८० लाख रुपयांना खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. ३१ मार्च रोजी या व्यवहाराची नोंद झाली होती.

देशातील प्रसिद्ध गुंतवणूकदार आणि डी-मार्ट या सुपरमार्केट्सचे मालक असलेले
यांनी मुंबईतील मलबार हील या ठिकाणी एका बंगला खरेदी केला होता. यासाठी दमानी यांनी तब्बल १००१ कोटी रुपये मोजले. हा व्यवहार मुंबईतलाच नव्हे तर देशातील सर्वात महागडा व्यवहार ठरल्याचे जाणकारांनी म्हटलं होते. मलबार हीलमधील नारायण दाभोलकर मार्गावर असलेलया ‘मधुकुंज’ या नावाच्या प्रॉपर्टीची राधाकिशन दमानी आणि गोपीकिशन दमानी यांनी १००१ कोटी रुपयांना खरेदी केली. याची दस्त नोंदणी ३१ मार्च रोजी झाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here