वाचा-
राष्ट्रपती म्हणाले की, ‘सिंधूने सातत्य, समर्पण आणि उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. ऑलिम्पिक खेळामध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. भारताचा गौरव वाढविल्याबद्दल तिचे अभिनंदन.’
वाचा-
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘सिंधूच्या तारांकित कामगिरीमुळे आम्ही सर्वजण आनंदी आहोत. ती भारताची शान आणि सर्वात उत्कृष्ट ऑलिम्पिकपटू आहे. कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन.’
वाचा-
काँग्रेस नेते राहुल गांधींनी सिंधूच्या विजयाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. भारतासाठी कांस्य जिंकल्याबद्दल आमच्या तेलुगू मुलीला शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन, अशा शब्दांत जगन मोहन रेड्डींनी सिंधूला शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा-
परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले की, ‘सिंधूला पाहून आनंद झाला. भारतासाठी दुसरं पदकं घरी आणलं. या भव्य यशाबद्दल तिचं अभिनंदन.’ तर माजी केंद्रीय क्रीडा मंत्री रिजिजू म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे तिसरे पदक… कांस्य पदक जिंकल्याबद्दल तुमचा खूप अभिमान आहे. वैयक्तिक दुसरं पदक जिंकत भारताला अभिमानित केलं.
वाचा-
भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देशाला खूप अभिमानास्पद अशी कामगिरी केल्याबद्दल सिंधूचे अभिनंदन केले आहे. ‘ईसायी, मुस्लीम, सीख, हिंदू, सबको जोडे पी.व्ही.सिंधू. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू. खूप अभिनंदन,’ असे भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. तसेच व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, दिनेश कार्तिक आणि शिखर धवन यांनीही सिंधूचे अभिनंदन केले आहे.
वाचा-
दरम्यान, कांस्य पदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या बिंग जिआओचा 21-13, 21-15 असा पराभव केला. या विजयासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली महिला आणि दुसरी भारतीय ठरली आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक जिंकले होते. त्या आधी दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times