वाचा:
‘अलीकडं महाराष्ट्रावर सतत काहीना काही संकटं येत आहेत. अतिवृष्टीचं संकट मोठं आहे. हजारो घरांमध्ये पाणी शिरलं. होतं नव्हतं ते वाहून गेलं. या संकटावर मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली. एकीकडे पूरग्रस्तांची घरं बांधण्याचं आव्हान तर दुसऱ्या बाजूस मुंबईतील कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल मुख्यमंत्र्यांनी उचललं आहे,’ असं पवार काल म्हणाले होते. महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते यांनी ट्वीट करत पवारांच्या या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘गेले दीड वर्ष मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील शाब्दिक खेळ, भावनिक आवाहनं आणि ड्रायव्हिंग हेच जनता पाहत आलीय. मुख्यमंत्री ठाकरे आता ज्या प्रकल्पांचा शुभारंभ करत आहेत, ते देवेंद्र फडणवीस यांनीच सुरू केले आहेत,’ असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या अपयशी कारकिर्दीची यादीच सादर केली आहे. ‘करोनातील अपयश, मराठा आरक्षण टिकवण्यात अपयश, ओबीसी आरक्षण अपयश, पूरग्रस्तांना मदतीत अपयश, शेतकऱ्याना मदतीत अपयश…’ अशी ही यादी आहे. ही अपयशाची यादी आणखी वाढू शकते,’ असंही उपाध्ये यांनी पुढं म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times