मुंबई : मुंबईतील एका निवासी सोसायटीमध्ये असं काही सुरू होतं की थेट ‘नो किसिंग झोन’चा बोर्ड लावला लागला आहे. ही घटना आहे बोरिवलीच्या सत्यम शिवम सुंदरम सोसायटीची. मीडिया रिपोर्टनुसार, लोकांचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन झाल्यापासून काही जोडपी त्यांच्या सोसायटीच्या पुढे रस्त्यावर उभी राहत होती. काही जोडप्यांचे तर रस्त्यावरच किसिंग सिन चालायचे. जे लोकांना फार आक्षेपार्ह वाटत होतं.

सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना ते आवडलं नाही. यामुळे जोडप्यांना वैतागलेल्या सोसायटीने गेटच्या बाहेर ‘नो किसिंग झोन’ असं पेटिंग केलं. सगळ्यात खास बात म्हणजे हे पेटिंग केल्यापासून जोडप्यांचे तिथं येणं खूप कमी झालं आहे.

अधिक माहितीनुसार, सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबाने पहिल्यांदा जोडप्यांना जवळच्या रस्त्यावर किस करताना पाहिले होते. त्याने त्यांचा व्हिडिओही बनवला आणि तो स्थानिक नगरसेवकाला पाठवला. नगरसेवकाने हा व्हिडिओ पोलिसांना देण्यास सांगितले. पण त्यांना पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर, सोसायटीच्या सदस्यांनी त्यांचे मत विचारात घेतल्यानंतर गेटच्या बाहेर ‘नो किसिंग झोन’चा बोर्ड लावले.

‘सोसायटीमध्ये राहतात लहान मुलं’
सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विनय अन्सूरकर म्हणाले की, ‘आम्ही जोडप्यांच्या विरोधात नाही. पण त्यांच्याकडून केलेल्या कृत्यांच्या विरोधात आहोत. हे आमच्या घरासमोर घडत होते. सोसायटीमध्ये अनेक मुले आणि वृद्ध लोक राहतात. पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून आम्हाला रस्त्यावर नो किसिंग झोनचं पेंटिंग करावं लागलं. सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे हा IPC च्या काही कलमांखाली गुन्हा आहे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here