आज राज्यात मृत्यूची संख्या दोन आकडी असली तरी देखील राज्यातील मृत्यूदर मात्र २.०१ टक्क्यांवरच स्थिरावला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ०३ हजार ३२५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६५ टक्के एवढे झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा:
पाहा, कोणत्या जिल्ह्यात किती सक्रिय रुग्ण!
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ७५ हजार ३०३ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १५ हजार ४७३ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ७४४ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ४१६ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ०६८ सक्रिय रुग्ण आहेत. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत ५२७६ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार २७६ इतकी आहे. तर, रायगडमध्ये २ हजार ५५९, रत्नागिरीत २ हजार १४९, सिंधुदुर्गात १ हजार ८८८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या १ हजार ७३९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ९३६ इतकी आहे.
नंदूरबारमध्ये फक्त ९ सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ६७२, नांदेडमध्ये ही संख्या ४५० इतकी आहे. जळगावमध्ये ४४९, तसेच अमरावतीत ही संख्या ८२ इतकी आहे. तर यवतमाळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १४७ इतकी झाली आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या नंदूरबार जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ९ वर आली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
४,६१,६३७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ८३ लाख ५२ हजार ४६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख १५ हजार ०६३ (१३.६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ६१ हजार ६३७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार १०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times