राज्यातील या अकरा जिल्ह्यांमध्ये करोनावर नियंत्रण मिळालेले नाही. या जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक असून सिंधुदुर्ग, सातारा आणि अहमदनगरसारख्या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. केंद्र सरकारने देखील राज्यातील या जिल्ह्यांचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. करोनाची संख्या वाढणाऱ्या या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बध लावण्याची आवश्यकता असल्याचे केंद्र सरकारने देखील म्हटले होते. या जिल्ह्यांमध्ये करोनावर पुरेसे नियंत्रण मिळालेले नसल्यानेच राज्य सरकारने या ११ जिल्ह्यांना निर्बंधातून सूट दिलेली नाही.
क्लिक करा आणि वाचा-
आजचे आदेश पाहता आता या ११ जिल्ह्यांना करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
मुंबई, मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्याबाबत निर्णय नाही
राज्यातील २५ जिल्ह्यांना कडक निर्बंधांमध्ये शिथिलता देत असताना राज्य सरकारने मुंबई जिल्हा, मुंबई उपनगरे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याबाबत मात्र कोणताही निर्णय घेतला नाही. इतर २५ जिल्ह्यांप्रमाणे या तीन जिल्ह्यांध्ये निर्बंध शिथिल करावेत की उर्वरित ११ जिल्ह्यांप्रमाणे कडक निर्बंध कायम ठेवावेत याबाबत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी घ्यायचा आहे.
क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या आढावा बैठका होत असून या बैठकांमध्ये मुंबई आणि ठाण्यात निर्बंध शिथिल करायचे की कायम ठेवायचे यावर निर्णय घेण्यात येणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times