: दिवसेंदिवस ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून त्याआधारे अनेकांना गंडा घातल्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. अशातच रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर आली असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावानेच एक बनावट अकाऊंट तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाचं बनावट तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. या बनावट फेसबुक अकाऊंटपासून सावधगिरी बाळगण्याचं आवाहनही रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

‘Collectorate Ratnagiri या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, सदर फेसबुक अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास ती न स्वीकारता ब्लॉक करण्यात यावी,’ असे आवाहन डॉ. बी एन पाटील यांनी केलं आहे.

या प्रकरणी सायबर क्राइमकड़े तक्रार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्यासोबतही जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा अकाऊंटवरून या प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावे मित्रयादीतील लोकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली जाते. त्यामुळे अशा घटनांतून आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करताना सजग राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here