ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे करणाऱ्यांवर चांगलेच संतापले आहेत. कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अशी भूमिका मांडतानाच या लोकांना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू देऊ नका, अशी थेट मागणीच राज ठाकरे यांनी ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

कास्टिंग काऊचविरोधात ज्या तरुणींनी आवाज उठवला त्या तरुणींचेही राज ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आज राज ठाकरे यांनी ठाण्याचे पोलिस आयुक्त जयजित सिंह यांच्याशी कास्टिंग काऊचबाबत चर्चा केली. कास्टिंग काऊच प्रकरणातील जे आरोप आहेत त्यांना अशी कलमे लावा की त्यांना जामीनच मिळू नये, अशी मागणीच राज ठाकरे यांनी सिंग यांच्याकडे केली.

क्लिक करा आणि वाचा-
अनेक तरुणी कास्टिंग काऊचच्या जाळ्यात अडकल्या आहेत. मात्र त्या तरुणी धाडसाने पुढे आल्या आणि त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. अशा तरुणींचे आपण अभिनंदन करत असल्याचे राद ठाकरे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
एका नवोदित अभिनेत्रीला कास्टिंग काऊचला अनुभव आल्यानंतर तिने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली होती. या अभिनेत्रीकडे चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याचे या अभिनेत्रीचे म्हणणे होते. या अभिनेत्रीच्या तक्रारीची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी सापळा रचला. त्या सापळ्यात आरोप करण्यात आलेला दिग्दर्शक आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला होता.

क्लिक करा आणि वाचा-

मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या फार्महाऊसवर हा सापळा रचला होता. तेथे जाऊन कार्यकर्त्यांनी या दिग्दर्शकाला घेरले आणि त्यानंतर त्याला चोप दिला. या कार्यकर्त्यांनी या अभिनेत्रीची या दिग्दर्शकाच्या हातून सुटका केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here