भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर बाबुल सुप्रियो यांनी आपल्या निर्णयाबद्दल सांगितलं. खासदारकीही घटनात्मक आहे. राजकारणापासून दूर राहूनही कर्तव्य पूर्ण करता येऊ शकतं. यामुळे आपल्या २०२४ पर्यंतचा खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करेन, असं सुप्रियो म्हणाले. आसनसोलमध्ये अनेक विकास कामं केली जात आहेत. ही कामं पूर्ण करूवून घेतील. तसंच खासदार असूनही ते दिल्लीतील सरकारी बंगला एक महिन्याच्या आत रिकाम करणार आहेत.
‘भाजप सोडून कुठल्याही पक्षात जाणार नाही’
आपण भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आधीही आपली इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आपण राजकारणातून संन्यास घेण्याचा पूर्ण विचार केला आहे. नड्डांनी आपल्याला भरपूर स्ने दिला. पण भाजप सोडून इतर कुठल्या पक्षात जाणार नाही, असं बाबुल सुप्रियो यांनी पुन्हा स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times