नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणून मूळचे नागपूरचे असलेले न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांची नियुक्ती झाली आहे. देशाच्या सरन्यायाधीशपदी नागपूरच्याच शरद बोबडे यांची अलीकडंच नियुक्ती झाली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयातील सर्वोच्च पदाचा मान नागपूरला मिळाल्यानं नागपुरातील विधी क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे.

वाचा:

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा जन्म नागपुरात २० एप्रिल १९५८ रोजी झाला. त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात घेतले. त्यांनी बीएससी पदवी १९७७, विधी पदवी १९८० मध्ये नागपूर विद्यापीठातून प्राप्त केली. त्यानंतर नागपूर उच्च न्यायालयात १९८० मध्ये वकिली सुरू केली. प्रारंभी त्यांनी जबलपूर येथील वाय. एस. धर्माधिकारी याच्यकडे काही काळ वकिलीचे धडे घेतले. त्यानंतर एच. एस. घारे यांच्याकडे वकिली केली. दरम्यान, घारे हे दिवाणी न्यायाधीश झाल्यामुळे धर्माधिकारी यांनी स्वत:ची वकिली सुरू केली. त्यांनी राज्य सरकारची विविध महामंडळे, उद्योग, कर्मचारी संघटना यांचे खटले कामगार न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत लढवले. १५ मार्च २००४ रोजी मुंबई उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून विराजमान झाले. तर, १२ मार्च २००६ रोजी न्यायमूर्ती झाले. विद्यमान मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्याकडं मुख्य न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here