पुण्यात करोना संसर्गावर म्हणावे तसे नियंत्रण मिळालेले नसल्याने येणारा साधेपणाने साजरा करावा अशा सूचना नव्या नियमावलीअंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत. त्याच प्रमाणे गणेशोत्सवात गणपतीच्या मूर्तीच्या उंचीवरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या सूचनेनुसार सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती ४ फुटाहून उंच नसावी असा नियम करण्यात आला आहे. तर घरगुती गणेशाची मूर्ती ही २ फुटांचीच असावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
‘गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी’
गणरायाच्या आगमनाची मिरवणूक आणि विसर्जन मिरणुकीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. तसेच प्रशासनाने आखून दिलेल्या मर्यादेतच गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जावेत, अशा सूचना सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आली आहे. तसेच गणेशोत्सवाच्या काळात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
महत्वाचे नियम थोडक्यात:
> सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची मूर्ती ४ फुटाहून उंच नसावी.
> घरगुती गणेशाची मूर्ती ही २ फुटांचीच असावी.
> गणरायाचेआगमन आणि विसर्जन मिरणुकीवर पूर्णपणे बंदी.
> प्रशासनाने आखून दिलेल्या मर्यादेतच गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जावेत.
> गणेशोत्सव काळात करोनाच्या नियमांमध्ये कोणतीही शिथिलता नाही.
> सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी.
क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times