नाशिकः नाशिकमध्ये राहणाऱ्या या चिमुकल्याचा दुसरा वाढदिवस त्याच्या आई-वडिलांसाठी खास ठरणार आहे. दुर्मिळ आजारानं लढणाऱ्या शिवराजच्या उपचारांसाठी लागणारं १६ कोटींचं इंजेक्शन त्याला मोफत मिळालं आहे.

नाशिकमध्ये राहणाऱ्या शिवराज डावरे याला दुर्मिळ असा स्पायनल मस्क्युलर अट्रोपी टाइप १ हा आजार झाला होता. १० हजार मुलांमध्ये एकाला हा आजार होतो. या आजारावर परिणामकारक इंजेक्शन एक अमेरिकी कंपनी तयार करते. या इंजेक्शनची किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे. शिवराजचे आई- वडिल हे मध्यवर्गीय घरातून आले आहेत. शिवराजचे बाबा झेरॉक्सचे दुकान चालवतात. त्यामुळं या इंजेक्शनची किंमत ऐकून त्यांच्यावर आभाळच कोसळलं होतं. मात्र, त्या अमेरिकी कंपनीच्या लकी ड्रॉमध्ये शिवराजची निवड होऊन त्याला १६ कोटी रुपयांचं इंजेक्शन मोफत मिळालं. पीटीआयनं या संबधी वृत्त दिलं आहे.

वाचाः

शिवराज डावरेच्या वडिलांचे नाशिकमध्ये झेरोक्सचे दुकान आहे. मध्यमवर्गीय कुटुंब असल्यानं शिवराजच्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली होती. पण त्यांनी प्रयत्न सोडले नव्हते. शिवराजला योग्य उपचार मिळावे म्हणून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी हिंदुजामधील डॉक्टर यांनी शिवराजला झोलजेनस्मा हे इंजेक्शन देण्याची गरज असल्याचं सांगितलं. मात्र, त्या इंजेक्शनसाठी १६ कोटींचा खर्च येणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. इतकी रक्कम उभारणं शक्य नसल्यानं सुरुवातीला आम्ही हतबल झालो होत, असं शिवराजचे वडील विशाल डावरे यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.

वाचाः

अमेरिकेतील जी कंपनी हे इंजेक्शन तयार करते त्यांच्यावतीने क्लिनिकल ट्रायल्ससाठी लॉटरी पद्धतीने रुग्णांची निवड केली जाते. या लॉटरी पद्धतीत निवड झालेल्या रुग्णाला हे इंजेक्शन मोफत देते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानुसार आम्ही तिथे अर्ज केला. २५ डिसेंबर २०२०ला त्या लकी ड्रॉमधून शिवराजची निवड झाली. १९ जानेवारीला २०२१ला शिवराजला हिंदूजा रुग्णालयात ते इंजेक्शन देण्यात आलं. शिवराजला इंजेक्शन मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे. आणि त्याचा दुसरा वाढदिवस त्याच्या आई- वडिलांसाठी खास ठरणार आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here