मुंबई: राजकीय नेत्यांच्या मुला-मुलींनी राजकारणात सक्रिय होणं हे आपल्याकडं नवीन नाही. बहुतेक पक्षातील बहुतेक नेत्यांची मुलं आपल्या आईवडिलांचा वारसा चालवताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यास अपवाद नाही. या पक्षातील अनेक नेत्यांची मुलं, पुतणे व इतर नातेवाईक सार्वजनिक जीवनात काम करत आहेत. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी देखील हाच कित्ता गिरवला आहे. ते सध्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय झाल्याचं दिसत आहे. नुकत्याच आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळीही प्रतीक यांनी सांगलीत जयंत पाटलांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. पुरात अडकलेल्या लोकांना मदत, अन्न पाण्याचा वाटप करण्याबरोबरच मुक्या जनावरांची देखभाल करण्याचं कामही त्यांनी केलं. त्यानंतर आज प्रतीक यांनी आज उपमुख्यमंत्री यांना मागण्यांचं एक निवेदन दिलं. ‘सारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील युवक-युवतींच्या हितासाठी नवीन उपक्रम राबविण्यात यावेत, अशी मागणी प्रतीक यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

वाचा:

‘सारथी’ संस्था मराठा समाजातील मुलांसाठी उत्कृष्ट काम करत आहे. मात्र, या संस्थेच्या माध्यमातून अधिक नवे उपक्रम राबवले जाऊ शकतात. शिक्षण प्रशिक्षण, कौशल्य विकास या त्रिसूत्रीच्या आधारे सारथीनं काम केल्यास मराठा समाजातील युवक-युवतीच्या विकासासाठी मोठं काम होईल, असं प्रतीक यांनी निवेदनात म्हटलं आहे. केवळ निवेदन देऊनच ते थांबले नाहीत, त्यांनी काही उपयुक्त सूचनाही सरकारला केल्या आहेत.

प्रतीक पाटील यांनी केलेल्या सूचना

  • सारथीतर्फे मराठा समाजातील युवक-युवतींना IIT व IIM या जागतिक दर्जाच्या भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष प्रशिक्षणाचे कोर्सेस आयोजित करावेत. त्यासाठी शालेय पातळीपासूनच प्रबोधन करता येईल.
  • मराठा समाजातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करावेत.
  • मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी, जर्मन, फ्रेंच इत्यादी भाषांचे वर्ग सुरू करणे.
  • इतर व्यावसायिक कौशल्ये जसे की सुतारकाम, प्लंबर, इत्यादीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करणे.
  • जागतिक दर्जाच्या विद्यापीठात शिकण्यासाठी मराठा समाजाच्या शंभर विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देणे.
  • मराठा समाजातील पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना विशेष प्रोत्साहनपर भत्ता सुरू करणे.

वाचा:

  • मराठा समाजातील उद्योगपतीचा एक सेतू उभारून व्यवसायभिमुक कौशल्ये विकसित होण्यासाठी केंद्र सुरु करणे.
  • मराठा समाजातील मुला-मुलींसाठी पुणे, मुंबई व दिल्ली येथे हॉस्टेल्स उभारणे.
  • मराठा समाजातील भूमिहीन व अल्पभूधारक व्यक्तींच्या पाल्यांचा डाटा जमा करून ते शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर फेकले जात नाहीयेत, याचे ट्रॅकिंग करणे, व शिक्षणाच्या मूळ प्रवाहाबाहेर गेलेल्या मुला-मुलींना प्रवाहात आणणे.
  • जीवनाच्या विविध क्षेत्रात जागतिक व राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या व्यक्तींचे सारथीसाठी सल्लागार मंडळ स्थापन करून वेळोवेळी नवीन धोरणे ठरवून अंमलात आणणे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here