नव्या नियमावलीनुसार ठाणे जिल्ह्यात व्यापारी आणि दुकानदार वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील मॉल्स आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
पाहुयात, काय आहे ठाणेकरांसाठी सुधारित नियमावली!
१. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने आठवड्यातील सर्वच दिवस रात्री १० वाजेपर्यंत चालू राहणार.
२. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी ही दुकाने, आस्थापना बंदच राहणार आहेत.
३. शॉपिंग मॉल्स मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.
४. औषधांची दुकाने (मेडिकल आणि केमिस्ट शॉप्स) सर्व दिवस पूर्ण वेळ सुरु राहणार आहेत.
५. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र त्यांना सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. रविवारी मात्र रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स पूर्णपणे बंद राहतील. पार्सल आणि टेकअवे सुविधा आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेनुसार सुरु असणार आहेत.
६. केशकर्तनाये (सलून), ब्युटी पार्लर्स, स्पा, व्यायामशाळा, योगाचे वर्ग इत्यादी ५० टक्क्यांच्या क्षमतेने (सोमवार ते शनिवार) रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णपणे बंदच असतील.
७. जलतरण तलाव आणि जेथे व्यक्तीचा जवळून संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक प्राधिकरण यांनी दिलेल्या वेळेनुसार परवानगी असणार आहे.
८. सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने हे फक्त व्यायाम करणे, चालणे (वॉकिंग), धावणे (रनिंग) आणि सायकलिंग यासाठी सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
९. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये मात्र १०० टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
१०. सर्व कृषी विषयक सेवा, औद्योगिक सेवा, बांधकाम उद्योग आणि मालवाहतूक सेवा नेहमीप्रमाणेच चालू राहतील.
११. सर्व सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.
१२. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.
१३. चित्रीकरण करण्यास मात्र नियमित वेळेनुसार परवानगी देण्यात आलेली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times