मुंबई: राज्यातील १९ जिल्ह्यांमधील सुमारे १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर ३० मार्चला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राज्यपालांनी सदस्यांमधून सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळल्यानं आता थेट सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे.

राज्यातील दीड हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार असून, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका होत आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज ६ ते १३ मार्च या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. १८ मार्च रोजीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान २९ मार्च रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. मतमोजणी ३० मार्च रोजी होईल.

ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- १३, रायगड – १, रत्नागिरी- ८, नाशिक- १०२, जळगाव- २, अहमनगर- १, नंदुरबार- ३८, पुणे- ६, सातारा- २, कोल्हापूर-४, औरंगाबाद- ७, नांदेड- १००, अमरावती- ५२६, अकोला- १, यवतमाळ- ४६१, बुलडाणा- १, नागपूर- १, वर्धा- ३ आणि गडचिरोली- २९६.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here