नवी दिल्लीः दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या ( ) झाली आहे. आता विरोधकांनी यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( ) यांना लक्ष केलं आहे. यावरून राजकारण सुरू आहे. भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( ), काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी ( ) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील कायदा-सुव्यवस्थेवर केजरीवाल यांचा सवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनेचा निषेध केला आहे. राजधानी दिल्लीतील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्याची गरज आहे. दिल्लीत ९ वर्षांच्या एका निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली. दोषिंना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आपण जाणार आहोत. न्यायासाठी पीडित कुटुंबाला सर्व मदत केली जाईल, असं केजरीवाल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

काँग्रेसचा अमित शहांवर निशाणा

दिल्लीतील बलात्काराच्या या घटनेवरून काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीत जंगलराज सुरू आहे, असा आरोप काँग्रेसने केला. राहुल गांधी यांनी ट्वीट केलं. दलिताची मुलगीही देशाची मुलगी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. प्रियांका गांधी यांनीही ट्वीट करून अमित शहांना टीकेचं लक्ष्य केलं. गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदारी सांभाळता येत नाहीए, असा आरोप प्रियांका यांनी केला.

दिल्लीच्या नांगलमध्ये मुलीसोबत झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि निषेधार्ह आहे. मुलीच्या कुटुंबीयांवर काय प्रसंग ओढावला असेल याचा विचार करा? दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले गृहमंत्री उत्तर प्रदेशात प्रमाणपत्र वाटण्यासाठी गेले होते. पण त्यांना स्वतःचीच जबाबदारी सांभाळता येत नाहीए. हाथरसपासून ते नांगलपर्यंत जंगलराज सुरू आहे, असा आरोप प्रियांका गांधी वाड्रा यांनी केला.

दिल्ली महिला आयोगाना मागितली माहिती

दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. पोलिसांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रकरण अतिशय गंभीर आहे. तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. दक्षिण-पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांनी ५ ऑगस्ट किंवा त्यापूर्वी हजर व्हावं. या प्रकरणी प्राथमिक माहिती सादर करावी, असं दिल्ली महिला आयोगाने म्हटलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here