वाघ यांनी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यातून त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ‘सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्यामुळं त्यांचा केंद्र सरकारबद्दलचा द्वेष उफाळून आला आहे. आपलं पगारी काम निभावण्यासाठी त्यांना आज हतबलतेनं बीफचंही समर्थन करावं लागतंय,’ असा आरोप वाघ यांनी केला आहे.
ठाकरे सरकारच्या कारभारावरही वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. ‘मागील दोन वर्षात ठाकरे सरकारनं ‘फटे लेकीन हटे नही’चं धोरण अवलंबलं आहे. ‘औरंगाबादच नाव संभाजी नगर करणारच… कोविडमध्ये जीव गमावलेल्या पत्रकारांना पन्नास लाख देणार… MPSC च्या सर्व पदांची भरती ३१ जुलैपर्यंत करणार… लॉकडाऊन काळातील वीजबील माफ करणार… अशी आश्वासनं ठाकरे सरकारनं दिली होती. मात्र, त्याचं पुढं काहीच झालं नाही. ‘जे औरंगजेबालाही जमलं नाही, ते वारी बंद करण्याचं कृत्य मात्र या सरकारनं केलं,’ असा संताप वाघ यांनी व्यक्त केला आहे.
वाचा:
‘ठाकरे सरकारची ही ‘फटे लेकीन हटे नही’ची वृत्ती खूपच कौतुकास्पद आहे. त्याचा सार्थ अभिमान दिल्लीच्या युवराजांना वाटल्यामुळंच त्यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिली,’ असा टोला वाघ यांनी संजय राऊतांना हाणला आहे.
खांद्यावर हात टाकला त्यात वाईट काय?
राहुल गांधी हे संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत असल्याचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. त्याबाबत राऊत यांना विचारलं असता, ‘शिवसेना आणि काँग्रेस हातात हात घालून काम करत आहेत. हातातला हात खांद्यावर आला इतकंच. त्यात वाईट काय आहे,’ असं राऊत यांनी म्हटलंय.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times