मुंबई: मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी एकजुटीचे विरोधकांचे प्रयत्न सुरूच असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पवारांनी निवडलेल्या या वेळेवरून राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या () यांनी मोठं विधान केलं आहे.

राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत दमानिया यांनी आतापर्यंत पाठपुरावा केला आहे. त्यामुळं दमानिया यांच्या वक्तव्यांकडं राजकीय वर्तुळाचं बारीक लक्ष असतं. सध्या राज्यात व देशात घडत असलेल्या घडामोडींच्या अनुषंगानं त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

वाचा:

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल विरोधी पक्षाच्या नेत्यांना ‘ब्रेकफास्ट’चं निमंत्रण दिलं होतं. त्यात मोदी सरकारला संसदेत घेरण्याबरोबरच येत्या काळात सरकारविरोधात आघाडी उभी राहू शकते, याची चाचपणी झाल्याची चर्चा आहे. या बैठकीची चर्चा सुरू असताना शरद पवार हे अमित शहा यांना भेटले. त्यामुळं वेगळ्याच चर्चेला उधाण आलं. या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. ‘राज्यपाल हे राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या भूमिकेवर चर्चा झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव राजभवनच्या सचिवांना राज्य सरकारची नाराजी कळवणार आहेत,’ असं मलिक यांनी काल सांगितलं. ‘राज्यपालांनी स्वत:ला मुख्यमंत्री समजू नये,’ असा टोलाही मलिक यांनी हाणला होता. त्यामुळं महाविकास आघाडी भाजपविरोधात एकजुटीनं लढत असल्याचा संदेश गेला होता. मात्र, दमानिया यांनी या घडामोडींचा वेगळा अर्थ लावला आहे.

वाचा:

‘लष्करी हल्ला करताना जसं कव्हर फायरिंग करतात, तोच प्रकार आपण आज पहिला. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद फक्त शरद पवार आणि अमित शहा यांच्या भेटीला एक ‘कव्हर अप’ करण्यासाठी होती. आम्ही भाजपच्या विरोधातच आहोत हे ठाकरेंना दाखवण्यासाठी बहुतेक हे सर्व करण्यात आलं असावं,’ असा अंदाज दमानिया यांनी वर्तवला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here