‘आशिष शेलार हे तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून धुळ्यात आज त्यांनी पक्षसंघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘ जिल्हा परिषदेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार धर्मभास्कर वाघ याची राज्यातील जनतेला सतत आठवण व्हावी आणि घोटाळ्यांमध्ये धर्मभास्करचे बाप निघावेत असे एक एक चेहरे ठाकरे सरकारच्या काळात उघड होत आहेत. धर्मभास्करही तोंडात बोटं घालेल असं सध्याचं चित्र आहे,’ असं शेलार म्हणाले.
वाचा:
‘पोलीस यंत्रणेचं कधी नव्हे इतकं खच्चीकरण ठाकरे सरकारच्या काळात झालं आहे. अधिकऱ्यांमध्ये वॉर सुरू आहे. बार, पब, डिस्को, लेडीज बार आणि काळे धंदे राजरोस सुरू आहेत. दलालांमार्फत बदल्या आणि बदल्यांची दलाली घेणे सुरू आहे. आता चाईल्ड प्रोनोग्राफी सारखे भयंकर प्रकार उघड होत आहेत,’ असंही ते म्हणाले.
‘राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पुरती कोलमडली आहे. आएएस दर्जाचे अनेक वरिष्ठ अधिकारी अनेक दिवस नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत तर सतत बदल्या करून अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्ची करण्यात आलं आहे. ‘तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी’ अशी राज्याची स्थिती असल्याचा टोला शेलार यांनी हाणला.
वाचा:
‘कुणी कुणाचे ऐकत नाही. राज्य शासनाच्या दिशाहीन कारभारामुळं राज्याची दिशा कोणती हेच कळत नाही. सत्तेतील तीन पक्ष एकमेकांशी भांडतात. एकमेकांच्या पक्षप्रमुखांविषयी वक्तव्य येतात, त्यावरून वाद होतात. तीनही पक्षांमध्ये बेदिली माजलेली आहे, यातून नेतृत्वाची बेअदबी होत आहे,’ याकडं शेलार यांनी लक्ष वेधलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times