सोशल मीडियाव्दारे मौजे पोसरे, ता.खेड येथील ४ मयताच्या वारसांना दिलेले मदतीचे धनादेश परत घेतले गेले. याबाबत सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्या बातम्या आल्या आहेत. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे खुलासा खेडचे प्रांताधिकारी अविनाश सोनोने यांचा खुलासा मागविण्यात आला होता. त्यांनी पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे.
मौजे पोसरे, तालुका खेड येथील दुर्घटनेमधील मयतांपैकी 4 मयताच्या वारसांना मदतीचे चेक माजी पालकमंत्री महोदय यांचे हस्ते प्रदान करण्यात आले होते. तथापि दुर्घटनाग्रस्त लोकांचे घरच गाडले गेल्यामुळे त्यांचे बँक खाते क्रमांक किंवा त्याबाबतचा तपशील वारसांकडे उपलब्ध नसल्यामुळे व संबंधीत बँक ३० किमी अंतरावर चिपळूण येथे असल्यामुळे मयतांचे नातेवाईक आणि श्यामकुमार गणपत मोहीते, अध्यक्ष, बौध्द समाज यांनी विनंती केल्यामुळे बँकेत जाऊन तलाठी यांचेमार्फत मयतांचे वारस यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी ताब्यात घेतले होते.
तसेच इतर १६ लाभार्थ्याचे Union bank मधील बँक अकाउंट शोधून त्यांना रु.६२ लाख रुपयांचे चेक देण्यात येऊन बँकेत जमा करण्यात आले आहेत. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी कळवि्लयाने चेक परत घेतले या विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या दाव्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times