मुंबई: पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्या चर्चेचा तपशील समोर येऊ शकलेला नसला तरी या भेटीवरून मुख्यमंत्र्यांवर टीका होत आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानं या भेटीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांचा अजेंडा राबवून महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेल्या कौलाशी प्रतारणा करू नये,’ अशी अपेक्षा माकपनं व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे-संभाजी भिडे भेटीच्या पार्श्वभूमीवर माकपचे राज्य सचिव, माजी आमदार यांनी पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी संभाजी भिडेंवर तोफ डागली आहे. ‘करोनाशी वैज्ञानिक दृष्टीनं हात करण्यात पुढाकार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी करोनाविषयी चुकीची, बेलगाम आणि जनतेला मृत्यूच्या खाईत लोटणारी विधानं करणाऱ्या संभाजी भिडे यांची भेट घेणं अत्यंत खेदजनक व धक्कादायक आहे. भिडे हे विद्याविरोधी गृहस्थ असून अनावश्यक विधानं करून अंधश्रद्धा विरोधी कायदा मोडत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला वारंवार आव्हान देत आले आहेत,’ असा आरोप आडम यांनी केला आहे.

वाचा:

‘२०१८ मध्ये भीमा-कोरेगाव येथे भिडे यांनी दलित आणि दलितेतर समाजात वितुष्ट निर्माण करून सामाजिक सौख्याचं पालन करणाऱ्या महाराष्ट्रधर्माला भिडे यांनी चूड लावली. या एकाच गुन्ह्यासाठी त्यांची येरवडा तुरुंगात रवानगी करायला पाहिजे होती. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. समाजात विष पेरणाऱ्या अशा माणसाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेणं धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तुरुंगात निरपराध वयोवृद्ध विचारवंत, मानवाधिकार कार्यकर्ते मृत्यूमुखी पडत असताना त्यांच्या छळाला कारण ठरलेल्या भिडे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय आश्वासन दिलं, हे जनतेला समजलं पाहिजे. सांगली दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदींनी या विद्याविरोधकाचे पाय धरले होते. या भेटीत नेमके कुणी कुणाचे पाय धरले, हे समजायला हवं,’ असं आडम यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here