मुंबई: रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून मृत्यू झालेल्या १७ व्यक्तींच्या वारसांना देण्यात आलेले मदतीचे चेक दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आल्यामुळं राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी हे चेक परत घेण्यात आल्याचं मान्य केलं आहे. मात्र, ते का परत घेतले याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ( on Posare Cheque Row)

‘सरकारनं केलेल्या घोषणेनुसार, पोसरे गावातील मृतांच्या वारसांना मी स्वत: जाऊन मदतीचे चेक दिले होते. मात्र, ज्या बँकेत चेक डिपॉझिट करावयाचे होते, ती बँक ३० किलोमीटर लांब होती. तिथं जाण्याची अडचण होती. शिवाय, अनेक घरं दरडीखाली गेल्यानं काही लोकांच्या बँक खात्याचे क्रमांक व अन्य तपशीलही मिळत नव्हता. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर गावातील प्रमुख प्रतिनिधींनी सरकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सरकारचा एक प्रतिनिधी आमच्याबरोबर दिला जावा व त्यांनी चेक जमा करण्यास मदत करावी, अशी विनंती गावच्या प्रतिनिधींनी केली. त्यांच्या विनंतीवरून दुसऱ्या दिवशी तलाठ्यांनी हे चेक परत घेतले. ज्या वारसांच्या बँकेचा तपशील उपलब्ध नव्हता किंवा ज्यांना बँकेत जाणं शक्य नव्हतं, अशा लोकांचे चेक स्वत: सरकारी प्रतिनिधींनी जमा केले आहेत,’ असं अनिल परब यांनी सांगितलं. याबाबत दाखवल्या जाणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचं त्यांनी सांगितलं.

वाचा:

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी देखील अनिल परब यांच्या माहितीस दुजोरा दिला आहे. ‘पोसरे गावातील चार व्यक्तींच्या बँक खात्याचे तपशील उपलब्ध नव्हते. त्यांची खाती शोधून काढून सरकारी प्रतिनिधींनी त्यांचे चेक जमा केले आहेत. एकूण १७ वारसांपैकी १६ जणांचे ६२ लाखांचे चेक जमा करण्यात आले आहेत. एका व्यक्तीचा वारस पुढं न आल्यानं मदत प्रलंबित आहे,’ असं पाटील यांनी सांगितलं.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here