टोकियो : राष्ट्रकुल आणि आशियाइ क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारी विनेश फोगट ही भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळे भारतीयांना विनेकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. उद्या विनेश पहिल्यांदाच टोकियो ऑलिम्पिकमध्ये उतरणार आहे. त्यामुळे आता विनेशकडून भारतीयांना उद्या मोठ्या अपेक्षा असतील.

आतापर्यंत विनेशने भारतासाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतही विनेशने पदकाची कमाई केली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये विनेशने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. आतापर्यंत आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने तब्बल आठ पदके पटकावली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रकुल आणि आशियाई गेम्समध्ये तिने प्रत्येकी २-२ पदके आपल्या नावावर केली आहेत. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विनेशने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे उद्या विनेश कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्या सकाळी आठ वाजता विनेशचा पहिला सामना होणार आहे.

भारताने बुधवारी कुस्तीमध्ये कशी कामगिरी केली, पाहा… रवी कुमारने ५७ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवविरुद्ध रवी कुमारने २-१ अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर नूरीस्लामने रवी कुमारविरुद्ध ९-२ अशी मोठी आघाडी घेऊन धक्का दिला. पण रवीने जोरदार कमबॅक केले आणि विजय मिळवला. रवी कुमारने बुल्गारियाच्या जॉर्जी वालेंटिनो वांगेलोव याचा टेक्निकल सुपिरियोरिटीने पराभव करून उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती.

भारताच्या अंशु मलिकला आज पराभव पत्करावा लागला, पण अंशुला ज्या एरिनाने पराभूत केले आहे ती आता अंतिम सामन्यात पोहोचली आहे, त्यामुळे ती आता सुवर्णपदक पटकावू शकते. कुस्तीमधील नियमानुसार जो खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतो आणि त्याने ज्या खेळाडूंना पराभूत केले असते त्यांना कांस्यपदक पटकावण्याची संधी असते. कुस्तीमध्ये या गोष्टीला रेपिकेच असे म्हटले जाते. त्यानुसार आता एरिना अंतिम फेरीत पोहोचली आहे. त्यामुळे एरिनाकडून पराभूत झालेल्या भारताच्या अंशु मलिकला आता कांस्यपदक पटकावण्याची नामी संधी असेल. हे सामना उद्या होणार आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here