स्नेह भोजनाला येता येणार नाही, असं सांगत मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपती भवनकडे खेद व्यक्त केलाय. दुसरीकडे काँग्रेस केंद्र सरकारवर नाराज आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत परंपरेनुसार बैठकीची परवानगी दिली नाही. यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनकडून निमंत्रण न आल्याने राज्यसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझादही या स्नेह भोजनाला जाणार नाहीत. सोनिया गांधी या काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या नेत्या आहेत.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्नेह भोजनाचे निमंत्रण न दिल्याने लोकसभेतील काँग्रेसच नेते अधीर रंजन चौधीरी या कार्यक्रमाला जाणार नाहीए. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी ट्रम्प यांच्या स्वागत सोहळ्यावर होणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times