म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला करोना निगेटिव्ह अहवाल सक्तीचा केल्याने सीमा भागातील नागरिकांची मोठी कुचंबना होत आहे, ही सक्ती कर्नाटक सरकारने तातडीने बंद करावी म्हणून शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको आंदोलन केले. टोल नाक्यावरील तपासणी बंद न केल्यास नाका फोडण्याचा इशारा राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दिला आहे. ( and do not want to show at )

पुणे-बेंगलोर महामार्गावरून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी केली जात आहे. त्यासाठी कर्नाटक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. महामार्गावरून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची व व्यक्तीची तपासणी केली जाते. दोन डोस किंवा 72 तासातील करोनाचा rt-pcr चा निगेटिव्ह अहवाल असल्याशिवाय कोणालाही कर्नाटकात सोडले जात नाही. यामुळे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या अनेकांची कुचंबणा सुरू झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
कोगनोळी नाक्याच्या पलीकडे कागल, चंदगड, आजरा, गडहिंग्लज यासह काही सीमाभाग जाणाऱ्यांची अडचण होत आहे. कर्नाटकाच्या अरेरावी वृत्तीने सीमा भागातील लोकांना त्यांच्या गावी जाणेही अडचणीचे ठरत आहे. यामुळे तपासणी नाका तातडीने बंद न केल्यास गुरुवारी कोगनोळी नाका फोडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी मंगळवारी दिला होता. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना त्यांनी निवेदन दिले होते.

क्लिक करा आणि वाचा-
बुधवारी दुपारी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत पुणे-बंगलोर महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. भर पावसात झालेल्या या आंदोलनामुळे हा मार्ग अर्धा तास वाहतुकीला बंद राहिला. यामुळे दोन्ही बाजूला सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कर्नाटक सरकारने त्या राज्यात प्रवेश करताना प्रत्येक नागरिकांची करोना अहवाल निगेटिव्ह असण्याची सक्ती बंद करावी, अन्यथा दोन दिवसात हा नाका फोडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भैया माने यांनी दिला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान , महाराष्ट्रातील वाहने कर्नाटकात सोडण्यात अडथळा आणल्यास कर्नाटकातील वाहने महाराष्ट्रात येऊ देणार नाही असा इशाराही राष्ट्रवादीने दिला आहे. गुरुवारी कर्नाटकचा नाका फोडण्याचा शिवसेनेने दिलेला इशारा आणि राष्ट्रवादीने आज दिलेला इशारा यामुळे सीमा नाक्यावर तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने कर्नाटक राज्यातील प्रशासनाशी संवाद साधून याबाबत तोडगा काढण्याची विनंती कागल पोलिसांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनात संजय चितारी संजय ठाणेकर सुनील माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाग घेतला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here