मुंबईः राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी या तीन जिल्ह्यांचा तीन दिवसांचा दौरा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) आणि राज्यपालांमध्ये संघर्षाची नवी ठिणगी पडली आहे. ठाकरे सरकारनं राज्यपालांच्या या दौऱ्याला विरोध केल्यानंतरही आज राज्यपाल मराठवाड्यात रवाना होणार आहेत. मात्र, राज्यपालांच्या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे.

यांच्या नांदेडसह हिंगोली आणि परभणी जिल्ह्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. त्याबाबत मुख्य सचिवांमार्फत राजभवनला कळवण्याबाबत मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली होती. मात्र, मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार होईल, असं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे.

वाचाः

राज्यपालांच्या या दौऱ्यात नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तर, राज्यपाल नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करणार असल्याचं बोललं जात आहे. राजभवनाकडून जारी करण्यात आलेल्या राज्यपालांच्या सुधारित कार्यक्रम पत्रिकेत राज्यपाल तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकांसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत.

वाचाः

राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना आपण अजूनही मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. परंतु ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, याचा त्यांना विसर पडला आहे का, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. तसंच, राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करू पाहत आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here