घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलाव करणार आहे. तसंच, मोठ्या सोसायटींच्या गेटवर वाहन नेऊन मूर्ती स्वीकारण्यात येणार आहे. तसंच, विसर्जनासाठी सुमारे १७० कृत्रिमे तलाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्ते हर्षद काळे यांनी दिली आहे.
करोनाचे संकट कायम असल्यानं विसर्जनासाठी गर्दी होऊ नये, म्हणून पालिकेनं विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या छोट्या मूर्तींचे विसर्जन शक्यतो घरी करावे अन्यथा पालिकेच्या कृत्रिम तलावांत करावे, विसर्जन स्थळांवर गर्दी करु नये, असे आवाहन पालिकेनं केलं आहे.
वाचाः
मुंबईत करोना आटोक्यात येत असला तरी अद्याप संकट टळलेलं नाही. गणेशोत्सवात गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भीती आहे. तसंच, गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच सार्वजनिक मंडळासह अनेक घरगुती गणेशोत्सवासाठी नियोजन सुरु केले होते. त्या पार्श्वभूमीवर पालिकेनं हा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने नियमावली सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवांबाबत नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईसाठी आवश्यक नियमावली सुरू करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत येत्या १० ऑगस्टला पालिका आणि सार्वजनिक गणेशोत्सव समिती प्रतिनिधींसोबत बैठकही आयोजित करण्यात आली असल्याची माहिती हर्षद काळे यांनी दिली आहे.
वाचाः
नाशिकमध्येही निर्बंध
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कडक निर्बंध जाहीर केले असून, सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींसाठी नियमावली जाहीर केली आहे. सरकारच्या निर्देशानुसार, मंडप नियमावलीचे पालन आवश्यक आहे. तसंच, सार्वजनिक मंडळासाठी गणेशमूर्ती चार फूट उंच व घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फूट असेल, अशी नियमावली नाशिक महानगरपालिकेनं जारी केली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये नियमावली जाहीर
सार्वजनिक आणि घरगुती विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्ती चार फुटांची, तर घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.मंडळांनी गणपती मंडपांमध्ये निर्जुंतकीकरणाची आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी, प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी; तसेच करोनाविषयक नियमांचे पालन करावे, आगमनाच्या दिवशी मिरवणुकीचे आयोजन करू नये, असं पालिकेनं नियमावलीत म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times