वाचा:
‘तुम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम केलात… अभिनंदन टीम इंडिया’, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी संघाचं अभिनंदन केलं आहे. ‘आज ४१ वर्षांनंतर हॉकी संघाला कांस्यपदक मिळवता आलं आहे. हॉकी संघानं मिळवलेलं हे यश भारतीयांचा उर भरून आणणारं आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. ३-१ नं पिछाडीवर असतानाही भारतीय खेळाडू विचलित झाले नाहीत आणि योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम केला,’ असं पाटील यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हॉकीच्या सुवर्ण युगाची सुरुवात –
‘४१ वर्षांची प्रतीक्षा, प्रयत्न व परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’ युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल,’ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ‘भारतीय पुरुष हॉकी संघानं कधीकाळी ऑलिम्पिकची आठ सुवर्णपदकं जिंकली होती. १९८० च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. गेल्या वेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध १-३ अशा गोल पिछाडीवर असतानाही संघानं ५-४ गोलफरकानं मिळवलेला विजय हा दुर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परिश्रमांचं फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मनं जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचं अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times