एका वृत्तवाहिनीला अमृता फडणवीस यांच्या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टिप्पणी केली आहे. कोण अमृता फडणवीस?, असा सवाल करत अमृता फडणवीस अनेक असू शकतात, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रतिक्रिया देत राहू द्या. मी त्याच्यावर पुन्हा प्रतिक्रिया द्यावी असे नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुटुंबप्रमुख आहेत. ते जे निर्णय घेतात ते सर्वसामान्यांच्या भल्यासाठी घेत असतात. त्याला वळण देण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत अमता फडणवीस या राजकारण करत असल्याचे महापौर पेडणेकर यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
नेमके काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते एकत्रपणे एकमेकांची पाठ खाजवत आहेत, ते त्यांना खूप आवडतं आहे असे दिसत आहे, असे फडणवीस म्हणाल्या होत्या. राज्यपाल हे निष्ठावान आणि कतृत्ववान व्यक्ती आहेत. महाविकास आघाडीचे काही अंतर्गत राजकीय मुद्दे आहेत, ते पूर्ण होत नसल्याने त्यावरून ते राज्यपालांना लक्ष्य करत आहेत. पण असे व्हायला नको, असे फडणवीस म्हणाल्या होत्या.
क्लिक करा आणि वाचा-
पुण्यातील निर्बंधांबाबतही फडणवीस यांनी भाष्य केले होते. पुण्यात निर्बंध शिथिल करता येईल आणि तशी वेळ नक्कीच आलेली आहे, असे त्या म्हणाल्या. हे सहज करता येण्यासारखे असून एक धोरण ठरवून सरकारने पुण्यातील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणीही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times