: ‘मुख्यमंत्री यांनी करोना काळात ज्या संवदेनशीलतेने परिस्थिती हाताळली. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे. युवासेनेकडे देखील राज्यातील तरुण वर्ग आकर्षित झाला आहे. आगामी काळात राज्यभरातील विद्यापीठांच्या सिनेट निवडणुकांवर भगवा फडकविणार आहे,’ असा विश्वास युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आज जळगावात व्यक्त केला.

‘विधानसभा निवडणुकीनतंर शिवसेना सत्तेत आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. काही महिन्यातच करोनाची महामारी सुरू झाली. करोना काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्या संवदेनशीलतेने परिस्थिती हाताळली त्यामुळे त्यांची राज्यातच नव्हे तर देशात देखील लोकप्रियता वाढली आहे. पक्षासाठी या लोकप्रियतेचा फायदा होईल,’ असंही वरुण सरदेसाई म्हणाले.

राज्यभरात युवासेनेच्या माध्यमातून युवा संवाद दौरा सुरू आहे. या अंतर्गत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला आज गुरुवारी जळगाव जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली. या दौऱ्यासाठी युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई जळगावात आले होते. यावेळी त्यांनी युवा संवाद मेळाव्यानतंर माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे उपस्थित होते.

‘नव्या दमाचे तरुण पुढे आणायचे आहेत’
पुढे बोलताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले की, विधनासभा निवडणुका झाल्यानतंर दीड वर्ष करोना महामारीच्या काळात कमी झालेला संवाद करण्यासाठी युवा नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संवाद दौरा सुरू करण्यात आला आहे. या माध्यामातून संघटना कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवायची आहे. अनेक वर्षांपासून युवा सेनेत काम करणाऱ्यांना पुढे आणायचे आहे. १८ ते २५ वयोगटातील युवासेनेतील तरुणांना तालुका, जिल्हा पातळीवर उभे करून युवा सेनेची चांगली टीम तयार केली जाणार आहे. हेच युवा कार्यकर्ते दुपटीने काम करतील, असा विश्वास देखील याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला

‘तरुणांसाठी युवासेनेतर्फे युवा स्किल उपक्रम’
‘करोनाच्या काळात बेरोजगारीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देशातच नव्हे तर जगात हा प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांसाठी युवासेना युवा स्कील उपक्रम राबवत आहे. यातून वेगवेगळे स्कील तरुणांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच अकारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच मॉक सीईटीचे देखील आयोजन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती वरुण देसाई यांनी यावेळी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here