नवी दिल्ली: काँग्रेस नेते ( ) यांनी पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधत युवक काँग्रेसच्या कामाची प्रशंसा केली. आपल्याला युवक काँग्रेसचे आभार मानायचे आहेत. करोना काळात ज्या संघटनेने नागरिकांना मदत केली, ती युवक काँग्रेसने. देशासमोरील सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. पंतप्रधान मोदी रोजगाराबाबत एक शब्दही बोलत नाहीत. लाखो नागरिक बेरोजगार झाले. हे सरकार दोन-तीन उद्योगपतींसाठी काम करते. खासदार लोकसभेत विरोधात उभे आहेत. पण ते सत्य लोकसभा टीव्हीवर ( ) दाखवले जाणार नाही. सरकारचे काम सत्य लपवणं आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला.

दिल्ली कँट परिसरात ९ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्ये प्रकरणावरूनही सरकारवर निशाणा साधला. एका लहान मुलीची हत्या केली गेली. तिच्यावर बलात्कार झाला. मीडियातून ही बातमी दिली गेली. पण हे सरकार जनतेचा आवज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील तरुणाने आवाज उठवण्यास सुरुवात केली तेव्हा समजायचं मोदी सरकारचा शेवट आला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी बुधवारी ९ वर्षांच्या मुलीच्या पीडित आई-वडिलांची भेट घेतली. न्याय मिळवून देण्याचं आणि मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं. आपल्या फोनमध्ये मोदींनी पेगासस टाकले आहे. पेगासस हे आवाज दडपण्याचा प्रयत्न आहे. पण हे सरकार देशाचा आवाज दडपू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here