शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपलं लसीकरण प्रमाणपत्र सादर करावं. यानंतर दोन दिवसांत त्यांचा पगार जारी केला जाईल, असं मलूभूत शिक्षण विभागाचे अधिकारी ब्रजराज सिंह यांनी आदेशात म्हटलं आहे.
शिक्षकांचा पगार ऑनलाइन प्रक्रियेनुसार जारी केला जातो. शिक्षकांचा आयडी मॉड्यूलवर तयार होतो. यानंतर, ते वित्त आणि लेखा अधिकाऱ्याद्वारे ट्रेझरीच्या पोर्टलवर पाठवले जाते. आरबीआयच्या पोर्टलवर ट्रेझरी पाठवते. यानंतर शिक्षकांना पगार दिला जातो. एकदा पोर्टलवर अपलोड केल्यावर त्यात बदल करण्यास फारसा वाव नाही. आता जुलैचा पगार दीर्घकाळ प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. जुलैचा पगार आला नाही. तर ऑगस्टचाही पगार येणार नाही, असं उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हामंत्री ब्रजेश दीक्षित यांनी सांगितलं.
सुमारे ८५ टक्के शिक्षकांनी लसीकरण स्वेच्छेने केले आहे. तर विभागाने या लस घेण्यासाठी कुठलंही प्रोत्साहन दिलेलं नाही. जिल्ह्याती सुमारे ८,६५० शिक्षकांचा पगार थांबवला गेला आहे. या निर्णयाला विरोध केला जाईल, असा इशारा उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र कसाना यांनी दिला.
किती शिक्षकांनी लस घेतली, हा या आदेशा मागचा उद्देश होता. शिक्षकांचा पगार पुढील दोन दिवसांत जारी केला जाईल. पगार ट्रेजरीतून निघाला आहे, असं ब्रजराज सिंह यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times