नवी दिल्लीः दिल्लीतील हिंचारावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ट्विट करत नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय. नागरिकांनो शांतता बाळगा आणि देशात जातीयतेच्या नावाखाली फूट पाडणाऱ्या धर्मांध शक्तींचे मनसूबे उधळून लावा, असं ट्विट सोनिया गांधींनी केलंय.
ओवेसींनी केला हिंसाचाराचा निषेध
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध केलाय. एका पोलीस कॉन्स्टेबलचा आणि तीन नागरिकांचा यात बळी गेलाय. आपल्या देशात पाहुणे आले असताना असं हिंसाचार उफाळून येणं ही लज्जास्पद बाब आहे, असं ओवेसी म्हणाले.
दरम्यान, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीच्या राज्यपालांना पत्र लिहिलंय. इशान्य दिल्लीतील अल्पसंख्याक बहुल भागांना आपल्याला भेट द्यायची आहे. कृपया याची परवानी द्यावी, अशी मागणी आझाद यांनी केली आहे. उद्या भेट देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times