जालना : प्रेमात हल्लीची तरूणाई काय करेल याचा काही भरोसा देता येत नाही. असाच एक भयंकर प्रकार जालन्यामध्ये समोर आला आहे. तरुणीने प्रेमात धोका दिल्यामुळे एका युवकाने राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्याने फेसबूकवर लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील तरुणाने मुंबईतील कल्याण परिसरात राहत्या घरात फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. त्यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अंकुश नामदेव पवार असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आपण प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह म्हटले आहे. अंकुश दीड वर्षांपासून मुंबईतील कल्याण परिसरात एका खाजगी रुग्णालयात वार्ड बॉय म्हणून नोकरी करत होता. तो मूळचा जालना जिल्ह्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी असून गेल्या दीड-दोन वर्षांपासून तो मुंबईत नोकरीच्या शोधात गेला होता. त्याच्या पश्चात वयोवृद्ध आई-वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

माझं एक मुलीवर खूप प्रेम आहे. पण तिने वेळोवेळी माझा विश्वासघात केला. तिच्या घरच्यांनी आमच्या लग्नाला नकार दिला. इतकंच नाहीतर आपल्या भविष्यासाठी त्याने मुलीकडे सेविंग करण्यासाठी काही पैसेही दिले असल्याचं त्यानी म्हटलं आहे. मात्र, त्या तरुणीने आपली फसवणूक करून धोका दिल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करत असल्याचे त्याने लाईव्हमध्ये म्हटलं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here