भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांनी दानवे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली होती. मुंबई महानगर क्षेत्रातील पश्चिम भागात मोठ्या संख्येनं उत्तर भारतीय लोक राहतात. त्यांचा प्रवास सोयीचा व्हावा म्हणून वाराणसी-प्रयागराज आणि मुझफ्फरपूर-दरभंगासाठी दोन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात याव्यात. या गाड्या वांद्रे व वसई जंक्शन सोडाव्यात, अशी विनंती संजय पांडेय यांनी केली होती. तसं झाल्यास छत्रपती शिवाजी टर्मिनस व वांद्रे टर्मिनसवर होणारी गर्दी विभागली जाईल व वसई विरारमधील प्रवाशांचा वेळ व खर्चात बचत होईल. येथील लोकांना कुर्ला किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसला जावं लागणार नाही, याकडं पांडेय यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं होतं.
वाचा:
रावसाहेब दानवे यांनी उत्तर भारतीय नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर दोन विशेष गाड्या सुरू करण्याचा शब्द दिला आहे, अशी माहिती संजय पांडेय यांनी दिली आहे. संजय पांडेय यांच्या सोबत भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे इतर नेतेही उपस्थित होते.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times