मुंबई: करोनाची दुसरी लाट ओसरली असल्यानं मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजपनं आज मुंबई व ठाण्यातील ठिकठिकाणच्या रेल्वे स्थानकांवर ‘रेलभरो’ आंदोलन केलं. मोठ्या संख्येनं गर्दी करून आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेण्यात आलं. तर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांना दंडही ठोठावण्यात आला आहे. (Rail Bharo Andolan of BJP)

वाचा:

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात करोनाचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर मुंबई महापालिकेनं मुंबई शहर व उपनगरातील निर्बंधही उठवले आहेत. दुकानांना रात्री दहा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. सरकारी व खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची मुभा दिली आहे. मात्र, लोकल ट्रेन सुरू नसल्यानं नोकरदारांना नोकरीधंद्याच्या ठिकाणी पोहोचणं मुश्किल झालं आहे. रस्ते मार्गानं प्रवास करताना लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. वेळ आणि पैसे खर्च होत आहेत. लोकलवर अवलंबून असलेले छोटे-मोठे उद्योग व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळं आता करोना संसर्गाचा दर घटल्यानंतर तरी लोकल सुरू व्हावी, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे. किमान करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तरी लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, राज्य सरकार निर्णय घेत नसल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे.

भाजपनं आज याच नाराजीला वाट मोकळी करून दिली. प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखलं आणि ताब्यात घेतलं. लोकल सुरू नसतानाही प्रवासासाठी आलेल्या प्रवीण दरेकर यांना टीसींनी २६० रुपयांचा दंड ठोठावला. दरेकर यांनी स्वत: ही माहिती दिली. ‘आम्ही सर्वसामान्य माणसासाठी आवाज उठवत आहोत. पण सरकार रेल्वे सुरू करत नाही आणि आंदोलनही करू देत नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारची दडपशाही सुरू आहे,’ असा आरोप दरेकर यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here