नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील २८९ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश आहे. मात्र, अद्याप ४९ हजार ९४३ कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. उर्वरित यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. आता त्यात आपलं नाव येतं का? याकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात २८९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्रायोगिक तत्त्वावर दोन गावांतील शेतकऱ्यांची नावे या यादीत घेण्यात आली असून, उर्वरित यादी २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, यात १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. ६८ गावांतील लाभार्थ्यांची ही पहिली यादी आहे. तसेच ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संकलित करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंतची जाहीर केली होती. १५ हजार ३५८ शेतकऱ्यांच्या यादीत जिल्ह्यातील २८९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील ७८ गावांतील शेतकऱ्यांची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. यात नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा (बु) येथील ७७ शेतकरी आणि हिंगणा तालुक्यातील कानोली बारा येथील २१२ शेतकऱ्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. यातील शेतकऱ्यांची खात्री पटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू झाले आहे. यादी जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी ८५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या नावांची आधारलिंक केंद्रांवर तपासणी करण्यात आली.

जूनपासून शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज
नागपूर जिल्ह्यातील ५० हजार २३२ शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफीसाठी पाठविण्यात आली आहे. यापैकी सोमवारी केवळ २८९ शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली. उर्वरित यादी २८ फेब्रुवारीला जाहीर होणार असून यात ४९ हजार ९४३ शेतकऱ्यांची नावे येणे अपेक्षित आहे. अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्यात येणार आहे. मे २०२० पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जूनपासून शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here